बेबोने चित्रपटात घातले तब्बल १३० ड्रेस, केला होता नवा रेकॉर्ड, जाणून घ्या त्या चित्रपटाविषयी!

२०१२ मध्ये करीना कपूर मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटामध्ये करीनाने एका अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट हवा तसा चालला नाही.

    अभिनेत्री करीना कपूर एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत करीनाने विविध धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली होती. पण तुम्हाला माहितेय का करिनाने एका चित्रपटात तब्बल १३० विविध ड्रेस घातले होते. जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल.

    २०१२ मध्ये करीना कपूर मधुर भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटामध्ये करीनाने एका अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट हवा तसा चालला नाही. मात्र यामध्ये करीनाने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. ‘हिरोईन’ या चित्रपटात करीनाने तब्बल १३० निरनिराळे ड्रेस घातले होते. आणि हे सर्वच ड्रेस टॉप डिझायनर्स कडून डिझाईन करण्यात आले होते. करीना ही पहिलीच अभिनेत्री होती, जिने एकाच चित्रपटात तब्बल १३० ड्रेस घातले.

    काय आहे ‘हिरोईन’ चित्रपट

     ‘हिरोईन’ हा चित्रपट एका अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित होता. एखाद्या अभिनेत्रीला यशाची कशी सवय लागते आणि ज्यावेळी नवीन अभिनेत्री येऊ लागतात तेव्हा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो. तिचं स्टारडम कसं संपुष्टात येतं. तसेच तिच्या खाजगी आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो. हे दाखविण्यात आलं आहे.