पती राज कौशलच्या धक्कादायक निधनानंतर मंदिरा बेदी सावरतेय, प्रथमच सोशल मीडियवर झाली व्यक्त!

मंदिरा बेदीने राज यांच्याबरोबरचा एक आनंदी क्षण  फोटोतून शेअर केला आहे. सोबत लाल बदाम तुटल्याचं इमोजी शेअर केलं आहे.

  अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं ३० जूनला पहाटे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं. राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला मोठा धक्का बसला. राज कौशल यांच्या या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता राज यांच्या निधनानंतर सहा दिवसांनी मंदिराने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे.

  मंदिरा बेदीने राज यांच्याबरोबरचा एक आनंदी क्षण  फोटोतून शेअर केला आहे. सोबत लाल बदाम तुटल्याचं इमोजी शेअर केलं आहे. तिच्या या एका इमोजीने व्यक्त होण्याचीही सोशल मीडियाने त्वरित दखल घेतली. अनेक सेलेब्रिटींनी मंदिराच्या या Instagram Post वर प्रतिक्रिया देत तिला धीर दिला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

  राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीत म्युझिक डाररेक्टर सुलेमान यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केलाय. सुलेमान म्हणाले, ‘२९ जूनच्या संध्याकाळीच राजला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांनी पित्ताची काही औषधं घेतली आणि ते झोपले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांनी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं सांगितलं. राजने मंदिराला हार्ट अटॅक येत असल्याचं सांगताच तिने त्यांचा मित्र आशिष चौधरीला लगेचच फोन केला. आशिष मंदिराच्या घरी पोहचला. मंदिरा आणि आशिषने तातडीने राजला गाडीत बसवलं आणि ते रुग्णालयात निघाले. यावेळी गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं.. पुढच्या ५-१० मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबल्याचं मंदिराच्या लक्षात आलं. कदातिच तेव्हाच त्याने अखेरचा श्वास घेतला होता.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)

  राज कौशल यांना या आधी ते अवघ्या ३०-३२ वर्षांचे असताना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. तेव्हा पासूनच ते तब्येतीची काळजी घेत होते. असं सुलेमान यांनी या मुलाखतीत सांगितलं.