हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिष्टी मुखर्जी काळाच्या पडद्याआड

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिष्टी मुखर्जी (Bollywood actress mishti mukherjee) यांचं किडनीच्या (kidney failure) आजाराने निधन (passed away) झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिष्टी मुखर्जी (Bollywood actress mishti mukherjee) यांचं किडनीच्या (kidney failure) आजाराने निधन (passed away) झाल्याची माहिती समोर आली आहे. मिष्ठी अवघ्या २७ वर्षांची होती. गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार (Treatment) घेत होती. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा बंगरूळ येथे तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर काल शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

२०१३ साली मिष्टीनं ‘मैं कृष्णा हूं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने दिग्दर्शक राकेश मेहता यांचा चित्रपट ‘लाइफ की तो लग गई’मध्येही काम केलं होतं. चित्रपटांशिवाय मिष्टीचे बोल्ड म्युझिक अल्बम  प्रसिद्ध होते.

२०१४ मध्ये मिष्टी मुखर्जीवर सेक्स रॅकेट चालवल्याचाही आरोप झाला होता त्यावेळी तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती. तिच्या घरी धाड टाकण्यात आली त्यावेळी पोलिसांनी अनेक सीडीज आणि टेप्स सापडले होते. मिष्टी मुखर्जीच्या कुटुंबीयांवरही हे आरोप झाले होते.