shilpa shetty

बॉलिवूड कलाकार आपला अभिनय, चित्रपटाबरोबरच ट्विट, स्टेटमेंटस आणि खास करून त्यांच्या इतर बिझनेसमुळे अनेकदा चर्चेत येतात. या बॉलिवूड कलाकारांचा रेस्टॉरंट, हॉटेल असे अनेक व्यवसाय आहेत. त्यातील एक प्रसिध्द नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीने मुंबईत नवं अलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

बॉलिवूड कलाकार आपला अभिनय, चित्रपटाबरोबरच ट्विट, स्टेटमेंटस आणि खास करून त्यांच्या इतर बिझनेसमुळे अनेकदा चर्चेत येतात. या बॉलिवूड कलाकारांचा रेस्टॉरंट, हॉटेल असे अनेक व्यवसाय आहेत. त्यातील एक प्रसिध्द नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीने मुंबईत नवं अलिशान रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सोशल मीडियावर या अलिशान रेस्टॉरंटचे फोटो शेअर करत तीने स्वत:च ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

सोशल मीडियावर शिल्पा प्रचंड अक्टीव्ह असते. ती नेहमी आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर सतत अपडेट करते. शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत रेस्टॉरंट खूपच सुंदर दिसत आहे.

 

शिल्पाचं हे नवीन रेस्टॉरंट मुंबईच्या वरळी आणि वांद्रे परिसरात असल्याचं समजत आहे. कारण शिल्पाने हे फोटो शेअर करताना वरळी, वांद्रा असे हॅशटॅग वापरले आहेत. शिल्पाच्या या रेस्टॉरंटला अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया डिक्रूझ यांनी भेट दिली. रेस्टॉरंटनंतर शिल्पा लवकरच कर्जतमध्ये एक फार्महाऊस देखील खरेदी करणार आहे.