सोनाक्षी सिन्हा फिल्मफेअर न मिळाल्यामुळे झाली नाराज, घरी ट्रॉफी दाखवण्यासाठी असा केला जुगाड, VIDEO व्हायरल!

सोनाक्षीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकं तिच्या चित्रकलेचंही कौतुक करत आहेत. सोनाक्षीच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते आहे.

  फिल्मफेअर अवॉर्ड बॉलिवूडचा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानला ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं. तर तापसी पन्नूला ‘थप्पड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला कोणताही पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे ती निराश झाली आहे. पण तिने हार मानली नाही. स्वत: जुगाड करत फिल्मफेअर अवॉर्ड घरी आणला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

  सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती फिल्मफेअर अवॉर्डचा स्केच बनवताना दिसत आहे, तर बॅकग्राऊंडला किशोर कुमार यांचं ‘मेरे सपनों की राणी’ या गाण्याचं संगित वाजत आहे. चित्र पूर्ण झाल्यानंतर तिने या चित्राला किसही केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षीने लिहिलं की, ‘फिल्मफेअरपर्यंत तर पोहोचता आलं नाही, परंतु फिल्मफेअर माझ्यापर्यंत पोहोचला’.