‘ही’ अभिनेत्री घेतेय मड थेरपीचा आनंद, पण तीचा हा अवतार बघून नेटकरी मात्र चांगलेच सुटलेत, वाचा त्यांच्या भन्नाट कमेंट्स!

नुकताच उर्वशीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स उर्वशीच्या या फोटोवर दिल्या आहेत.

    अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच्या तिच्या ड्रेसमुळे चर्चेत येते. महागडे ड्रेस घालण्यात उर्वशीचा हात कोणीच धरू शकत नाही. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच उर्वशीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स उर्वशीच्या या फोटोवर दिल्या आहेत.

    उर्वशीने इन्स्टावर मड बाथ घेतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत उर्वशीच्या संपूर्ण शरीरावर मातीचा लेप दिसून येतोय. कॅप्शनमध्येही उर्वशीने मड बाथचं महत्व सांगितलं आहे. “माझं फेव्हरेट मथ बाथ/स्पा/ मड थेरपी… क्लिओपात्रा यांना देखील मड बाथ पंसत होता. माझ्या सारखे मॉर्डन असलेले अनेकजण मड बाथ पसंत करतात. बेरिलीक बीचच्या लाल मातीचा आनंद घेतेय. रोमन देवी व्हीनस या मातीचा उपयोग आरशासाठी करायच्या. ही खनिजांनी समृद्ध अशी माती आहे जी त्वचेसाठी उत्तम आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली आहे.” असं म्हणत उर्वशीने या मडबाथचे अनेक फायदे सांगितले आहेत.

    नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

    उर्वशीच्या या पोस्टवर अनेकांनी लाईकस् दिले आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या आहेत. यात एक युजर म्हणाला, ” मुलांनो पाऊस येण्याची वाट पाहतोय.” तर दुसऱा युजर म्हणाला, “पावसामुळे माझ्या घरासमोरही खूप चिखल साचला आहे. कमी पडला तर मागू शकतेस..लाजू नकोस.” असं म्हणत युजरने उर्वशीची थट्टा केलीय.