kangana ranavat

आयपीएल आणि कंगनाचे अकाऊंट सस्पेंड म्हणजे  देशात मनोरंजनाची कमतरता... अशी मजेशीर कमेंट यावर एका युजरने केली.

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर कंगना राणावत ट्विटरवर नेहमीप्रमाणे बरळली आणि यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केलं. ट्विटरच्या या कारवाईनंतर कंगना चांगलीच वैतागली आहे, पण बॉलिवूडचे काही जाण मात्र जाम खूष झाले आहेत. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, गुलशन देवैया आणि हंसल मेहता यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेन्ड होताच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तीला टोला लगावला आहे.

    रिचा चड्ढाने कंगनाचे नाव घेतलेले नाही. पण एक मीम शेअर केलं आहे. तिचा इशारा लोकांनी बरोबर ओळखला. Be Yourself. Somewhere Else असा मॅसेज लिहिलेले रिचाने शेअर केलेले मीम पाहून अनेक युजरने कमेंट केल्यात. आयपीएल आणि कंगनाचे अकाऊंट सस्पेंड म्हणजे  देशात मनोरंजनाची कमतरता… अशी मजेशीर कमेंट यावर एका युजरने केली.

    स्वराने कंगनाबद्दलची एक बातमी शेअर केली. एका फॅशन हाऊसने कंगनाची हकालपट्टी केल्याची ही बातमी शेअर करत, हे पाहून आनंद झाला, असे स्वराने लिहिले.

    अभिनेता गुलशन देवैया यानेही कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड होताच ट्विट केले. ‘तिने आपल्याच पायांवर कु-हाड मारून घेतली. बिचारा विराट, कुठलेही कारण नसताना त्याचे नाव गोवले गेले,’ अशी मजेदार प्रतिक्रिया त्याने दिली़ काल कंगनाने एक ट्विट केले होते. त्यात तिने नरेंद्र मोदींना सन २००० सारखे ‘विराट रूप’ दाखवण्याचे आवाहन केले होते.दिग्दर्शक हंसल मेहता यांनी यावर प्रतिक्रिया देताना ‘फुल्ल नौटंकी’ असे ट्विट केले.

    आमीन… मी कधी तिला भेटले असते तर कदाचित डाव्या पायाने हाणलं असतं. पण हा मार्ग उत्तम आहे. तिच्याशिवाय सोशल मीडिया आणखी मस्त वाटतोय, असे ट्विट करत अभिनेत्री कुब्रा सैतने कंगनाला सुनावले.