लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात असाल तरी तुम्ही लग्न करालच असं काही नाही, ‘या’ जोड्यांवरून झालय हे सिद्ध!

 बॉलिवूडमध्ये रिलेशनशीपमध्ये असणं हे अभिनेता- अभिनेत्रीसाठी नवीन राहिलेलं नाही. अनेक जोड्या रिलेशनशीपमध्ये राहणं पसंत करतात. मात्र अनेक वर्ष लिव्हइनमध्ये राहूनही या जोड्या वेगळं होणं पसंत करतात. बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, जे लिव्ह-इन मध्ये राहायचे. पण त्यांचं रिलेशन फार काळ चालू शकलं नाही.

  जॉन- बिपाशा

  जॉन आणि बिपाशा ही जोडी 9 वर्ष एकमेकांसोबत होते. त्यानंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नात्यात कटूता आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला होता. जॉन अब्राहम आणि बिपाशा बसु ही जोडी तर प्रसिद्ध होती. त्यांनी समोर येऊन स्वत:हून सांगितलं होतं की आम्ही सोबत राहत आहोत. दोघेही आपल्या रिलेशनवर अगदी सहज बोलायचे. पण आता हे दोघेही आपल्या पार्टनरबरोबर खूश आहेत.

  रणबीर कपूर – कतरीना

  रणबीर कपूर – कतरीना या दोघांची जोडी जास्त चर्चेत होती. रणबीर आणि कतरिना या रिलेशनशीपमुळे दीपिका पादूकोण यांच्यात ब्रेकअप झाल्याचं देखील बोललं जातं. रणबीर आणि कतरिना लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा होती. मात्र अचानक त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता रणबीर आलिया भट्टबरोबर रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

  अभय – प्रीती देसाई

  अभय देओल बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध कुटुंबातून येतो. अभय आणि प्रीती देसाई हे दोघे ४ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले. मात्र त्यांनीही नंतर लग्ना न करण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही एकमेकांपासून दूर गेले.

  लारा दत्ता – केली दोरजी

  हे दोघे जवळपास ८ वर्ष सोबत होते. इतकी वर्ष सोबत राहिल्यावर देखील त्यांनी वेगळंच राहण्याचा निर्णय घेतला.