NCB LOGO

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनप्रकणात मुच्छड पानवालाला समन्स पाठवाला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, मुच्छड पानवाला हा राहिला फर्निचरवाला हिच्या संपर्कात होता. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाला समन्स पाठवण्यात आला आहे.

एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता ब्रिटिश नागरिक करण सजनानीला एनसीबीने वांद्र्यातून ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून अमेरिकेतून मागवण्यात आलेला, अतिशय महाग खास प्रकारचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

इतर चौकशी सुरूच

त्याचप्रमाणे एनसीबीने अभिनेता अर्जुन रामपालची बहीण कोमल रामपाललाही एनसीबीने पुन्हा एकदा समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वीही कोमलला समन्स पाठवण्यात आला होता, परंतु ती चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्याशिवाय अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएलालाही चौकशीसाठी हजर राहावं लागलं होतं.