bollywood drug probe deepika padukone sara ali khan shraddha kapoor face ncb questioning today

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींची नावेदेखील उघड झाली आहेत. आज या तिघींची चौकशी होणार आहे.

  • दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात दाखल
  • थोड्याच वेळात होणार चौकशीला सुरूवात

मुंबई (Mumbai) : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) दीपिका पदुकोण, सारा अली खान,आणि श्रद्धा कपूरचीही आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करणार आहे.  दीपिका पदुकोण एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या (SSR Death Case) चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स (Drugs) प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिका पदुकोणसह बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावेदेखील उघड झाली आहेत. त्यामुळेच एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, आज या तिघींची चौकशी होणार आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. त्यानंतर दीपिका तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली आहे. तसंच आपण एनसीबीला तपासात सहकार्य करणार असल्याचं दीपिका पदुकोणने अलीकडेच म्हटलं आहे. त्यामुळे आज शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिकाची चौकशी होणार आहे. तसंच दीपिकासोबत सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीदेखील चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.