ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जून रामपाल NCB च्या ऑफिसमध्ये पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर एनसीबीने अर्जुनला समन्स बजावत त्याची चौकशी केली होती. आज पुन्हा अर्जून काही कागदपत्र घेऊन एनसीबीच्या ऑफिसमध्ये गेला आहे. रामपालच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलचा अहवाल आल्यानंतर आज पुन्हा रामपालला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

View this post on Instagram
एनसीबीने यापूर्वी अर्जुनची १७ नोव्हेंबरला चौकशी केली होती. तब्बल ६ तास अर्जुनची चौकशी झाली. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचीदेखील चौकशी झाली होती. अर्जुनच्या घरात ट्रामाडॉल या औषधी गोळ्या सापडल्या होत्या. या गोळ्यांवर भारतात बंदी असून या गोळ्या टॅब्लेट ड्रग्ज प्रकारात मोडत असल्याचं सांगण्यात येतं.
View this post on Instagram
अर्जुनला चौकशीचे समन्स बजावल्यानंतर त्याचा मेहुणा अॅगिसिलोस डेमेट्रियड्स याची मात्र सुटका झाली आहे. अॅगिसिलोस डेमेट्रियड्सला सोमवारी (१५ डिसेंबर) जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्याला तुरुंगातून सोडण्यात आलं आहे. मात्र, अर्जुनला आज चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे.