बाळाच्या जन्मानंतर सैफने करिनाला दिली Mercedes-Benz G-Class ही महागाडी कार गिफ्ट,Video सोशल मीडियावर व्हायरल!

करिनाच्या बाळाचा चेहरा पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच मुलासोबतच एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यातही मुलाचा चेहरा दिसत नव्हता. अद्याप या कपलनं आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.

  अभिनेत्री करिना कपूरने २१ फेब्रुवारीला आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. सैफिनाला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झाले. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मंगळवारी पहिल्यांदा सैफ आणि करिना मुंबईत एकत्र दिसले. सैफने दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाला महागडं गिफ्ट दिल्याचं समोर आलं आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

  हे दोघंही एका कारच्या टेस्ट ड्राइव्हसाठी घरातून बाहेर पडले होते. ही कार सैफ करिनाला गिफ्ट देणार असल्याचं समोर येत आहे. या दोघांनीही मंगळवारी (Mercedes-Benz G-Class) ची टेस्ट ड्राइव्ह घेतली. यादरम्यान सैफ गाडी चालवताना दिसला तर करिना बाजूच्या सीटवर बसली होती. यावेळचा दोघांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. Mercedes-Benz G-Class या कारची किंमत तब्बल २.५ कोटी इतकी आहे.