‘…..आणि मगच प्रॉपर्टीवर हक्क सांगा’, न्यायालयाच्या सुनावणीनंतर कपूर घराणं शोधतय कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्र!

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी असा आदेश दिला आहे की, कपूर कुटुंबाला पेपर्स सादर करण्यापासून सूट दिली जाऊ शकते, परंतु आरती सबरवाल यांच्याकडून त्यांना तशी मान्यता मिळाली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणतेही वाद होऊ नयेत.

    राजीव कपूर यांचे ९ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते राज कपूर यांचे सर्वात धाकटे चिरंजीव होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर आणि बहीण रीमा जैन यांनी त्यांच्या संपत्तीवर दावा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मालमत्तेवरील विवाद सोडवण्याच्या सुनावणीदरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेची आवश्यकता असल्यास त्यांनी राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

    आता कपूर कुटुंबात एक नवीन तणाव निर्माण झाला आहे. कारण राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नेमके कुठे ठेवली आहेत, हे सध्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला माहिती नाहीये.  यावर कुटुंबीयांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, राजीव कपूरने २००१ मध्ये आरती सबरवाल नावाच्या महिलेशी लग्न केले आणि २००३ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. परंतु कोणत्या कौटुंबिक न्यायालयात हा घटस्फोट झाला याची कल्पना कुटुंबाला नाही.

    उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी असा आदेश दिला आहे की, कपूर कुटुंबाला पेपर्स सादर करण्यापासून सूट दिली जाऊ शकते, परंतु आरती सबरवाल यांच्याकडून त्यांना तशी मान्यता मिळाली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणतेही वाद होऊ नयेत.

    राजीव कपूर यांनी आपल्या कारकीर्दीत ‘राम तेरी गंगा मैली’ नावाचा एक मोठा सुपरहिट चित्रपट दिला. हा चित्रपट वडील राज कपूर यांनी बनवला होता, पण मंदाकिनीने त्याच्या यशाचे सर्व श्रेय घेतले. यामागील एक कारण म्हणजे या चित्रपटातील तिची अत्यंत बोल्ड भूमिका. त्यानंतर राज कपूर यांनी त्यांच्यासाठी कोणताही चित्रपट बनवला नाही, ज्यामुळे राजीव त्यांच्या वडिलांवर नाराज झाले आणि कुटुंबापासून वेगळे राहू लागले.