sonu sood hotel

“सोनू सूदने जुहूमधील परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे”. नोटीस देण्यात आल्यानंतरही सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप पालिकेने केला आहे.

हॉटेलच्या इमारतीच्या बांधकामात बदल केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं कारवाईचा पवित्रा घेतल्यामुळं अडचणीत आलेला अभिनेता सोनू सूद याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. दिवाणी न्यायालयानं कारवाईपासून दिलेलं अंतरिम संरक्षण १३ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

महापालिकेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर सोनू सूदनं तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. महापालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंती त्याने केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं सोनू सूदला तात्पुरता दिलासा दिला.

मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतनंतर आपला मोर्चा अभिनेता सोनू सूदकडे वळवला आहे. त्यामुळे आता सोनू विरूद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. सोनू सूदने परवानगी न घेता जुहूमधील सहा मळ्यांच्या निवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप मुंबई महापालिकेनं केला आहे. मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे तक्रार

“सोनू सूदने जुहूमधील परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे”. नोटीस देण्यात आल्यानंतरही सोनू सूदने बेकायदेशीर बांधकाम सुरु ठेवण्यात आल्याचा आरोप पालिकेने केला आहे.

सोनू सूद म्हणतो,

“बदल करण्यासाठी मी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतलेली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. कोरोनामुळे परवानगी मिळू शकली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन.