डॉक्टर डॉनच्या सेटवर बॉनफायर, गप्पा आणि बरंच काही!

कोटीमधून उब घेऊन धमाल गप्पा रंगताना दिसत आहेत. डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकार ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन सुद्धा अशीच धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात. कधी गिटार वाजवून गाण्यांची मैफिल तर कधी सेटवर पक्वान्नांची मेजवानी रंगलेली असते. पण सध्या या थंडीच्या ऋतूमध्ये सर्व कलाकार या थंडीचा आनंद घेण्यात मग्न आहेत आणि याचेच काही खास फोटोज मालिकेच्या चाहत्यांसाठी.

सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यात सर्वजण दंग आहेत. सगळ्यांचं मनोरंजन करणाऱ्या झी युवावरील डॉक्टर डॉन या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. कडाक्याची थंडी असल्यामुळे रात्री शूटिंग करताना कलाकार थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. उब मिळवण्यासाठी हे सर्व कलाकार मिळून सेटवर शेकोटी करून माहोल बनवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

त्या शेकोटीमधून उब घेऊन धमाल गप्पा रंगताना दिसत आहेत. डॉक्टर डॉनच्या सेटवर कलाकार ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन सुद्धा अशीच धमाल मस्ती करताना पाहायला मिळतात. कधी गिटार वाजवून गाण्यांची मैफिल तर कधी सेटवर पक्वान्नांची मेजवानी रंगलेली असते. पण सध्या या थंडीच्या ऋतूमध्ये सर्व कलाकार या थंडीचा आनंद घेण्यात मग्न आहेत आणि याचेच काही खास फोटोज मालिकेच्या चाहत्यांसाठी.

1 doctor don

सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आणि अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.