‘एवढा पैसा कमावतेस तरी तुला ब्लाऊज घालता येत नाही का?’; शिल्पा शेट्टीसोबत असं काय घडलं, वाचा सविस्तर

शिल्पाबरोबर जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरी, परेश रावल आणि प्रणीता सुभाषही ‘हंगामा २’ मध्ये दिसणार आहेत. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टी नुकतीच 'हंगामा २'च्या प्रमोशनसाठी पोहोचली तेव्हा सर्वांचे लक्ष तिच्यावर होते. येथे ती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसली.

  मुंबई : शिल्पा शेट्टी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या सर्वात फिट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम अजिबात जाणवत नाही. सध्या शिल्पा शेट्टी तिच्या आगामी ‘हंगामा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर परतली आहे.

  शिल्पाबरोबर जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरी, परेश रावल आणि प्रणीता सुभाषही ‘हंगामा २’ मध्ये दिसणार आहेत. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टी नुकतीच ‘हंगामा २’च्या प्रमोशनसाठी पोहोचली तेव्हा सर्वांचे लक्ष तिच्यावर होते. येथे ती अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसली.

  ‘हंगामा २’ च्या प्रमोशनसाठी पोहोचलेली शिल्पा शेट्टी येथे बरगंडी कलर क्रॉप टॉप आणि लाँग ब्राऊन कलरच्या लेदर स्कर्टमध्ये दिसली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान घातलेला हा ड्रेस काही जणांना पसंत पडत आहे, तर बर्‍याच लोकांना तो अजिबात आवडला नाही. अनेक लोक शिल्पा शेट्टीची तुलना किम कार्दशियानशीही करत आहेत. यावर भाष्य करताना यूझर्स शिल्पा शेट्टीला बॉलिवूडची किम कर्दाशियन म्हणत आहेत.

  शिल्पा शेट्टीच्या लूकवर भाष्य करताना एका युझर्सने लिहिले की, ‘बॉलिवूडची किम कर्दाशियन.’ दुसर्‍याने लिहिले- ब्लाउज घालायला विसरली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  कपड्यांविषयी भाष्य करताना एका युझर्सने इतके पैसे मिळूनही हे लोक कपड्यांशिवाय फिरतात. त्याचबरोबर मीजान जाफरीबरोबर विनोद केल्याबद्दल काही युझर्स शिल्पा शेट्टीला ट्रोल देखील करत आहेत. वास्तविक, प्रमोशन इव्हेंटच्या वेळी शिल्पा मीझान जाफरीबरोबर विनोद करताना दिसली. जे काही युझर्सना आवडले नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला अहंकारीही म्हटले. त्याचबरोबर मास्क न घातल्यानेही शिल्पा ट्रोल होत आहे.

  brutally troll shilpa shetty over her dressing style during hungama 2 promotional event