दोन मुलांची आई सीता कशी होऊ शकते? करिनाच्या नावावरून सोशल मीडियावर ‘रामायण’!

करिनानं जास्त पैशांची मागणी केल्यामुळं रामायण चित्रपट लांबणीवर गेलाय त्यामुळे आता नेटकरी संतापलेले आहेत. अशातच सोशल मीडियावर बायकॉट करिना हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

    सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री करिना कपूर खानविरोधात संताप पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे, रामायण चित्रपट. रामायण चित्रपटातील सितेच्या भूमिकेवरुन सध्या सोशल मीडियावर महाभारत सुरु आहे. या भूमिकेसाठी करिनानं तब्बल १२ कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. तसेच, सुरुवातीला याच भूमिकेसाठी करिनानं १० कोटी रुपये मानधन मागितलं होतं. निर्मात्यांनी ते देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र आता करिनानं आणखी दोन कोटी वाढवून १२ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

    करिनानं जास्त पैशांची मागणी केल्यामुळं रामायण चित्रपट लांबणीवर गेलाय त्यामुळे आता नेटकरी संतापलेले आहेत. अशातच सोशल मीडियावर बायकॉट करिना हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याचप्रमाणे करिनाला चित्रपटातून काढून तिच्याजागी हिंदू अभिनेत्री घ्या, असा आग्रहदेखील नेटकऱ्यांनी केला आहे. अलौकिक देसाई हे त्याचे दिग्दर्शक आहे. तसेच बाहुबली या स्टारर चित्रपटाचे लेखक के. विजयप्रसाद हे या चित्रपटाचे लेखक आहेत. या चित्रपटासाठी करिनानं १२ कोटींची मागणी केली असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं आहे.

    अशातच करिना कपूर खान ही दोन मुलांची आई आहे, तिला या चित्रपटात सितेची भूमिका कशी मिळू शकते? असा सवाल संतप्त नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बायकॉट करिना हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आहे.