celina jaitly

सेलिनाने १७ नोव्हेंबर अर्थात ‘वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे’च्या (world pre maturity day) निमित्ताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाचा लहानपणी मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली(Celina jaitly) तिच्या सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे(Celina jaitly social media post) सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाचे निधन झाल्याचे म्हटले आहे. सेलिनाने १७ नोव्हेंबर अर्थात ‘वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे’च्या (world pre maturity day) निमित्ताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाचा लहानपणी मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

वर्ल्ड प्री-मॅच्युअरीटी डे या दिवशी वेळेपूर्वीच म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यांमध्ये अनेक लहान बालकांचा जन्म होतो त्यांच्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. मुलांचा प्री- मॅच्युअर जन्म ही खूप मोठी समस्या आहे. पण जे माता-पिता एनआयसीयूमध्ये आहेत त्यांना मी आणि माझा पती पीटर सांगू शकतो की आता गोष्टी बदलल्या आहेत’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे तिने म्हटले आहे की, ‘मी माझ्या एका मुलाला एनआयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देताना पाहिले आहे आणि दुसऱ्या मुलाचे निधन झाल्याचे पाहिले. पण एनआयसीयूमध्ये डॉक्टर आणि नर्स यांनी आमची खूप मदत केली. त्यांनी योग्य ते उपचार दिले. त्यांनी माझा मुलगा आर्थर लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रयत्न केले’ असे म्हटले आहे.