बिग बॉसमधील अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न, काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न, धक्कादायक कारण आलं समोर!

त्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला होता.

    बिग बॉस कन्नडची स्पर्धक अभिनेत्री चैत्रा कोट्टूर हिने राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. लग्नानंतर झालेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ८ एप्रिलला चैत्राने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या चैत्राची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

    चैत्राने उद्योजक असलेल्या नागार्जुनशी लग्न केलं आहे. नागार्जुनच्या कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्विकार न केल्यानं त्यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला होता. तर पोलिसांच्या माहितीनुसार नागार्जुननेदेखील काही लोकांच्या दबावामुळे हे लग्न केल्याचं म्हंटलं होतं. लग्नाची इच्छा नसतानाही केवळ काही लोकांच्या दबावामुळे त्याला हे लग्न करावं लागल्याचं त्याने म्हंटलं आहे.

    गेल्या महिन्यातच चैत्रा आणि नागार्जुनच्या मंदिरातील लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. गेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्नगाठ बांधली. मात्र नागार्जुनच्या कुटुंबियांनी चैत्रावर गंभीर आरोप केले आहेत. नागार्जुनला धमकावून हे लग्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.