badrike kushal

चला हवा येऊ द्या मधील सर्वच कलाकार हे आता प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचले आहेत. हे कलाकार कोणत्या परिस्थितीतून पुढे आले आहेत. हे आता सगळ्या प्रेक्षकांना माहितेय. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा गरीबीतून वर आलेला आहे. प्रत्येकजण स्ट्रगल करूनच आज इथपर्यंत पोहचलय. पण आज हे सगळे कलाकार प्रेक्षकांच मात्र भरपूर मनोरंजन करतात. पण या कलाकारांमधला एक कलाकार म्हणजे कुशल बद्रीके. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल.

गरीबीतही प्रेम जिवंत ठेवणाऱ्या काही व्यक्ती असतात, आणि तेच खरं प्रेम असतं, हे कुशलची लव्ह स्टोरी ऐकल्यावर अधोरेखित होतं. कुशल आपल्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना म्हणालेला, माझे वडिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यात नाटकाचे प्रयोग लागले की त्याला धडधड व्हायची कारण नाटकाचे भत्ते वेळेवर मिळायचे नाही. त्यातही प्रयोग लागले तर मग खायचं काय? असा प्रश्न नेहमी आवासून उभा रहायचा.

पुढे बोलताना तो म्हणाला,  माझ्याकडे पैसे नसायचे, पण कुणीतरी मुलगी माझ्या बॅगेत ५० ते ६० रुपये गुपचूप टाकायची. यामुळे माझं पोटंही भरायचं, वडापाव, बसभाडं सर्वकाही व्हायचं. जी मुलगी बॅगेत पैसे टाकायची ती माझीचं प्रेयसी होती आणि आज ती माझी बायको आहे.

आज ५०- ते ६० रूपयांमुळे सुरू झालेली कुशलची लव्ह स्टोरीच एका गोड संसारात रूपांतर झालं आहे. आज त्यांना एक छानसा मुलगी आहे. आज प्रत्येक सुख दुखात एकमेकांना साथ देत त्यांचा संसार सुरू आहे. त्यांच्या या गोड संसाराला कोणाची नजर ना लगो.