स्वाती आणि संग्राम अडकणार लग्नबंधनात,चंद्राच्या साक्षीने सुरू होणार दोघांचा संसार!

काही दिवसांपूर्वी संग्रामने स्वातीला लग्नाची मागणी घातली होती. श्रीधरकडून झालेल्या फसवणुकीनंतर स्वातीसाठी हा निर्णय घेण थोडसं कठीण होतं. पण, अखेर तिने निर्णय घेतला. आणि “तो क्षण आता आला आहे” स्वाती आणि संग्राम आता लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहेत.

    स्वाती आयुष्यात आलेल्या कसोट्यांना आजवर खूप धीराने सामोरी गेली. कितीही खडतर प्रवास असला तरी देखील तिने न खचता त्यांना तोंड दिले. कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते हे अगदी खरे. आता स्वातीच्या आयुष्यात पुन्हाएकदा सुखाची चाहूल लागली आहे. संग्रामच्या येण्याने स्वाती आता कुठेतरी श्रीधरने दिलेल्या धोक्यामधून बाहेर येऊ लागली आहे. तरीदेखील श्रीधरच्या काहीना काही कुरघोड्या कट कारस्थान सुरू आहेच. पण या सगळ्यामध्ये स्वातीला आता संग्रामची खंबीर साथ मिळाली आहे.

    काही दिवसांपूर्वी संग्रामने स्वातीला लग्नाची मागणी घातली होती. श्रीधरकडून झालेल्या फसवणुकीनंतर स्वातीसाठी हा निर्णय घेण थोडसं कठीण होतं. पण, अखेर तिने निर्णय घेतला. आणि “तो क्षण आता आला आहे” स्वाती आणि संग्राम आता लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाणार आहेत. स्वातीच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे.

    या लग्नसोहळ्यात श्रीधर आणि स्वातीचा सामना होईल का ? हा सोहळा आनंदात पार पडत असताना श्रीधर मिठाचा खडा तर टाकणार नाही ना ? श्रीधरच्या येण्याने कोणतं नवं वळण येईल ?  हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ? स्वाती आणि संग्रामचा हा लग्नसोहाळा कसा पार पडला हे नक्की बघा. या आठवड्यात सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

    लग्नानंतर स्वातीला कोणकोणत्या आव्हानांना समोर जावं लागणार आहे ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.