‘रामायण’मधील ‘आर्य सुमंत’ यांचे निधन, या बॉलिवूड चित्रपटांमध्येही केलं होतं काम!

१९९८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. ते या मालिकेतील सगळ्यात ज्येष्ठ कलाकार होते.

    प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ मधील आर्य सुमंतची भूमिका करणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज निधन झालं ते ९८ वर्षांचे होते. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या घरी आज ७.१० मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Shakti Arora (@shaktiarora)

    चंद्रशेखर यांनी सुरवातीला त्यांनी एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरवात केली. त्यानंतर ५० ते ९० च्या दशकात ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘बरसात की रात’, ‘कटी पतंग’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘नमक हलाल’, ‘डिस्को डान्सर’, ‘शराबी’, ‘त्रिदेव’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. १९९८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारली आणि ते घराघरात पोहोचले. ते या मालिकेतील सगळ्यात ज्येष्ठ कलाकार होते. त्यावेळी त्यांचं वय ६५ इतकं होतं. खरं तर चंद्रशेखर वैद्य आणि रामानंद सागर यांची घट्ट मैत्री होती. रामानंद सागर यांच्या म्हणण्यावरून त्यांनी ‘रामायण’ मालिकेत काम केलं होतं.

    अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे नातू विशाल शेखर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले, “आजोबा झोपेत असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांना कोणत्याच प्रकारचा आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून अंगावर भरपूर ताप असल्याने त्यांना गुरूवारी जुहू स्थित क्रिटी केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर ताप उतरला आणि आम्ही त्यांना एका दिवसांतच घरी आणलं.”