rhea chakraborty

कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह ७ ते ८ महिने बंद होती. यामुळे अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला. तो काही प्रमाणात फायदेशीरही ठरला. महानायक अमिताभ बच्चन आणि आभिनेता आयुषमान खुराणा यांची मुख्य भुमिका असलेला गिलाबो सिताबो हा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. आता अमिताभ यांचा आणखी एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. या चित्रपटासाठी हॉटस्टारला भलीमोठी रक्कम मोजावी लागली आहे.

कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह ७ ते ८ महिने बंद होती. यामुळे अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा मार्ग निवडला. तो काही प्रमाणात फायदेशीरही ठरला. महानायक अमिताभ बच्चन आणि आभिनेता आयुषमान खुराणा यांची मुख्य भुमिका असलेला गिलाबो सिताबो हा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. आता अमिताभ यांचा आणखी एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. या चित्रपटासाठी हॉटस्टारला भलीमोठी रक्कम मोजावी लागली आहे. या चित्रपटाचं नाव आहे चेहरे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 

या चित्रपटासाठी भलीमोठी रक्कम मोजण्यामागचं कारण म्हणजे या सिनेमात झळकणारा एक चेहरा. या चित्रपाट रिया चक्रवर्तीही मुख्य भूमिकेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया अधिक चर्चेत आली. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत चर्चेत आहे. याचाच फायदा मेकर्स घेत आहेत. मेकर्सच्या मते, रियाबद्दल जाणून घ्यायला सध्या सगळ्यांनाच खूप उत्सुकता असेल. रियाच्या नावाचा फायदा घेत चेहरे चा भाव वाढवण्यात आलाय. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने यावर बोली लावली, आणि त्यात हॉटस्टारने बाजी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 

चेहरे हा सिनेमा २४ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येतय. चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हश्मी, रिया चक्रवर्ती, सिध्दार्थ कपूर, अन्नू कपूर यांच्या भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)