‘चीकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोमध्ये मिथुन चक्रवर्ती, मालिकेबाबत उत्सुकता वाढली!

जेव्हा प्रोमोने दर्शकांना खिळवून ठेवलेच आहे तिथे स्टार प्लसने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे.

    स्टार प्लसचा आगामी शो, चीकू की मम्मी दूर की आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचे प्रेमळ नाते दाखवतो आणि त्यांच्यामध्ये नृत्य हा सामायिक धागा आहे. जेव्हा प्रोमोने दर्शकांना खिळवून ठेवलेच आहे तिथे स्टार प्लसने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक धमाका करण्याचा निर्णय घेतला आहे!!

    होय!! तुम्ही योग्य तेच ऐकले आहे, शोच्या निर्मात्यांनी ‘चीकू की मम्मी दूर की’च्या नवीनतम प्रोमोसाठी प्रतिष्ठित डिस्को डांसर, मिथुन चक्रवर्ती यांना सहभागी करून घेतले आहे. डांस शो असल्याकारणाने, या प्रोमोची शोभा वाढवण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांच्यापेक्षा योग्य नाव आणखी कोणते असू शकेल? इथपर्यंत ​​कि परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति या शोच्या मुख्य कलाकारांना देखील मिथुन आपल्या शोसोबत जोडले जात आहेत, हे बघून अत्यानंद होत आहे.

    ‘चीकू की मम्मी दूर की’चा हा नवा प्रोमो मिथुनजींच्या तेजस्वी व्यक्तित्व आणि आकर्षक आवाजात इतका आकर्षक वाटत आहे कि चाहते शोच्या  के लॉचिंगची श्वास रोखून वाट पहात आहेत. निश्चितच, हा नवीनतम प्रोमो पाहिल्यानंतर कोणीही म्हणेल, वाह! क्या बात है!!

    निर्माता गुल खान याविषयी म्हणतात की, “आज दर्शकांकडे कंटेंटसाठी अनेक विकल्प आहेत, हे लक्षात घेऊन दर्शकांच्या विकसित आवडीला कथानकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आम्ही आमचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’साठी देखील केले आहे. हा एक सुंदर शो आहे ज्यामध्ये आई आणि मुलीमधला त्वेष, भावना आणि एक प्रेमळ बंध दर्शवतो जो परिस्थितीमुळे वेगळे झाल्यानंतर देखील नृत्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडून ठेवतो.”

    त्या पुढे म्हणाल्या की, “मिथुन चक्रवर्ती यांची जीवन कहानी, जे स्वतः एक लीजेंड आहेत आणि  प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी खूप कठिण परिस्थितीचा सामना केला आहे, या कहाणीतील चीकू सारखीच आहे. यासाठी आम्हाला वाटले कि त्यांच्या उपस्थितीने वास्तविकतेशी जोडून घेता येईल. त्यांचे या प्रोमोसोबत जोडणे, खरोखर अद्भुत आहे आणि मिथुन सरांनी या शोमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या खरोखर जादुई आहेत!”