झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची धुरा छोट्या कलाकारांवर, परी आणि स्वराची रंगणार जुगलबंदी

ड्रामा क्वीन स्वरा(Swara And Pari To Host Zee Marathi Awards) आणि नटखट परी म्हणजेच मायरा या दोघी एकत्र आल्या तर काय धमाल येईल याची प्रचिती आता प्रेक्षकांना येणार आहे. परी आणि स्वरा एकत्र येणार म्हणजे धमाल आणि त्याचसोबत अनलिमिटेड मनोरंजन होणार यात शंकाच नाही. या दोघी लवकरच एकत्र दिसणार आहेत.

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’(Sa Re Ga Ma Pa Little Champs)मधील वन अँड ओन्ली ड्रामा क्वीन स्वरा जोशी(Swara Joshi) ही फक्त आपल्या गाण्यानंच नाही, तर कार्यक्रमातील इतर स्पर्धक आणि परीक्षकांची हुबेहूब नक्कल करून सर्वांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेतील परीनं(pari) आपल्या निरागस आणि गोड अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अल्पावधीतच परी म्हणजेच मायरा(Myra) ही संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.

    ड्रामा क्वीन स्वरा आणि नटखट परी म्हणजेच मायरा या दोघी एकत्र आल्या तर काय धमाल येईल याची प्रचिती आता प्रेक्षकांना येणार आहे. परी आणि स्वरा एकत्र येणार म्हणजे धमाल आणि त्याचसोबत अनलिमिटेड मनोरंजन होणार यात शंकाच नाही. या दोघी लवकरच एकत्र दिसणार आहेत. यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची धुरा नक्की कोण सांभाळणार परी कि स्वरा यासाठी दोघींमध्ये चुरस रंगताना दिसतेय.यावर्षी स्वरा आणि परीचं मजेदार सूत्रसंचालन यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचं आकर्षण ठरणार आहे. यंदा झी मराठी परिवारात मन झालं बाजींद, माझी तुझी रेशीमगाठ, मन उडु उडु झालं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?, ती परत आलीये या नवीन मालिकांची एंट्री झाली आहे. त्यामुळे या सोहळ्याला वेगळीच मजा येणार आहे.