‘छोटी सरदारनी’ चे ५०० भाग पूर्ण, मालिकेतील कलाकारांचे दणक्यात सेलेब्रेशन!

५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आणि कलाकार व टीमने या खास टी-शर्टस् परिधान करत हा क्षण साजरा केला.

    कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘छोटी सरदारनी’मध्‍ये प्रेम, ड्रामा, अॅक्‍शन आणि अविरत मनोरंजन करत आहे. सुरुवातीपासूनचा मालिकेने रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेतील हटके ट्विस्ट आणि टर्न रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. रसिकांच्या पाठिंब्यामुळेच आता या मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला आहे.५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आणि कलाकार व टीमने या खास टी-शर्टस् परिधान करत हा क्षण साजरा केला.

    मालिकेच्‍या यशाबाबत सांगताना निमरित म्‍हणाली, ”मेहेरच्‍या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि प्रशंसा मिळाली आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मालिकेचे कलाकार व टीम प्रत्‍येक चढ-उतारादरम्‍यान सहाय्य मिळाले आहे. आणि आमच्‍या अथक मेहनतीमुळे हा प्रवास अधिक आनंददायी बनला आहे. मेहेर व सरबच्‍या प्रवासाला पुन्‍हा एकदा रोमांचक वळण मिळणार आहे.”

    मालिकेच्‍या यशाबाबत सांगताना अविनेश म्‍हणाला, ”हा प्रवास अत्‍यंत उल्‍लेखनीय राहिला आहे आणि मी प्रत्‍येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला आहे. आम्‍ही हा नवीन सुवर्ण टप्‍पा गाठला असताना मी या सर्वांचे आभार मानतो. मी आमच्‍यामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या आणि आमच्‍या जीवनाचा भाग बनलेल्या मालिकेच्‍या चाहत्‍यांचे देखील आभार मानतो. मी सर्व चाहत्‍यांना इतकेच सांगू इच्छितो की, मालिका ‘छोटी सरदारनी’मध्‍ये पुढे बरेच रोमांचक क्षण पाहायला मिळणार आहेत.