सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा घटनाक्रम

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्यामुळे आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला 2 महिने उलटून गेलेत.. अद्यापही, याप्रकरणी कोणताच ठोस पुरावा हाती आलेला नाही. आता सीबीआयकडे या तपासाची सूत्र सोपवण्यात आली आहेत..

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता २ महिने पूर्ण झालेत. आता हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलाय.

आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडामोडी घडल्यात पाहुया.. 

१४  जूनला सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली. मुंबईतल्या वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. 

सुरुवातीच्या तपासात सुशांत सिंह डिप्रेशनने ग्रस्त असल्याचं समोर आलं. डिप्रेशनमुळेच सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं. सुशांत डिप्रेशनवर उपचार घेत असल्याचंही सांगण्यात आलं होतं. 

सुशांत सिंह राजपूर मृत्यूप्रकरणी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विट केलं होतं. बॉलिवूडमध्ये सुशांतला बॉयकॉट केलं जात असल्याचं शेखर कपूर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिजमने सुशांतचा बळी घेतल्याचं म्हणण्यात आलं. 

सोशल मीडियावर सुशांतसाठी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नेपोटिजमच्या दृष्टीने प्रकरणाचा तपास सुरू केला.. यात. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी करण जोहर, रुमी जाफरी यांची चौकशी करण्यात आली. तसेच मुंबई पोलिसांनी तब्बल ५० हून अधिक जणांची या प्रकरणी चौकशी केली. 

सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पटनामध्ये सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त आणि फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. 

 सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरनंतर बिहार पोलिसांचं एक पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालं. आणि त्याच दरम्यान मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील तणाव समोर आला. हळुहळू या प्रकरणाने राजकीय रंग घ्यायला सुरुवात केली. 

यानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांनीच करावा अशी याचिका रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली..

बिहार सरकराने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. केंद्र सरकारने बिहार पोलिसांची ही मागणी मान्य करत सीबीआयकडे प्रकरणाचा तपास सोपविला. याचदरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा संबंध सुशांतची आधीची मॅनेजर दिशा सालियनच्या हत्येशी जोडण्यात आला. 

यानंतर लाँड्रिंगचा आरोप रिया चक्रवर्तीवर करण्यात आाला. त्याच्या तपासासाठी ईडीने तपास सुरू केला. याप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, आणि वडिलांची चौकशी केली. त्याचप्रमाणे सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि सिद्धार्थ पिठानी यांचीही चौकशी केली. 

अजूनपर्यंत ईडीला या तपासात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र, अनेक संशयास्पद व्यवहार झाले असल्याचं समोर आलं. याप्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे.