‘दया तोड दो दरवाजा’ आता हे वाक्य पुन्हा घराघरात ऐकू येणार, कारण CID पुन्हा सुरू होतय?

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच सीआयडीचे फॅन्स आहेत. २० वर्ष सुरू असूनही या मालिके विषयी तितकीच उत्सुकता असते. या मालिकेचा प्रेक्षक वर्गही खूप मोठा आहे. गेले २० वर्ष मालिकेने २० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण मालिका बंद झाल्यामुळे काही प्रेक्षक नाराज आहेत. सीआयडी बंद का करण्यात आलं? हा सवाल वारंवार मालिकेत काम केलेल्या कलाकारांना विचारला जातो. पण लवकरच सीआयडी सुरू होण्याचे संकेत मालिकेतल्या कलाकाराने दिले आहेत.

सीआडीमध्ये दयानंद सीनिअर इन्स्पेक्टर दया ही व्यक्तिरेखा साकारत होता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यानं सीआडी बंद होण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “कुठल्याही गुन्हेगारी विषयावर आधारित असलेल्या मालिका तयार करताना काही मर्यादा येतात. सर्वात मोठी मर्यादा म्हणजे कथेमधील नाविन्य. पटकथा लेखकाला सतत नवीन काहीतरी शोधावं लागतं. अन्यथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं खूप कठीण जातं. आत्ताच्या प्रेक्षकांसमोर क्राईम विश्वावर आधारित शेकडो चित्रपट आणि मालिका आहेत. त्यामुळे कथानकात पुढे काय घडू शकतं याचा अंदाज ते सहज गतीने लावतात. सीआयडीच्या बाबतीतही असंच काहीसं घडू लागलं होतं. कथानकात हळूहळू तोच-तोचपणा येऊ लागला होता. त्यामुळे प्रेक्षक नाराज होण्याआधीच मालिका थांबवणं निर्मात्यांना योग्य वाटलं.

भविष्यात चांगल्या पटकथा तयार करण्यात आल्या तर कदाचित सीआयडी पुन्हा एकदा सुरू केलं जाऊ शकतं.” असा संकेतही दयानं या मुलाखतीत दिला. त्यामुळे सीआयडीच्या चाहत्यांनो लवकरच तुमची आवडती मालिका तुमच्या भेटीला पुन्हा येऊ शकते.