अनुराग कश्यपसह १४०० कलाकारांनी सेन्सॉरशिप कायद्याच्या विरोधात दाखल केली याचिका!

सरकारने २ जुलैपर्यंत सिनेमॅटोग्राफ विधेयक २०२१च्या मसुद्यावर सूचना मागितल्या होत्या. तथापि, काही निर्मात्यांनी यासंदर्भात सरकारकडे अधिक वेळ मागितला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर दक्षिण इंडस्ट्रीतील सेलेब्सही याला विरोध करत आहेत.

    चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नियमात सध्या काही नवे बदल होणार आहेत. मात्र, संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री या बदलांच्या विरोधात आहे. खरं तर, ज्या नवीन नियमांबद्दल बोलले जात आहे, त्यानुसार सेन्सॉर प्रमाणपत्रानंतर आधीच रिलीज झालेल्या चित्रपटाविरोधात काही तक्रारी आल्या असतील, तर सेन्सॉर पुन्हा त्यात लक्ष घालू शकणार आहे. मात्र, या नव्या नियमाविरोधात अनेक निर्मात्यांनी याचिका दाखल केली आहे.

    सरकारने २ जुलैपर्यंत सिनेमॅटोग्राफ विधेयक २०२१च्या मसुद्यावर सूचना मागितल्या होत्या. तथापि, काही निर्मात्यांनी यासंदर्भात सरकारकडे अधिक वेळ मागितला आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर दक्षिण इंडस्ट्रीतील सेलेब्सही याला विरोध करत आहेत. या बदलाबद्दल दक्षिण चित्रपट अभिनेता कमल हासन म्हणाले की, आम्ही तीन माकडांसारखे डोळे, तोंड आणि कान बंद करून राहू शकत नाही. यासंदर्भात अनेक बड्या प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इंडस्ट्रीमधील प्रत्येकजण त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे. विवेक अग्निहोत्री म्हणतात की, सरकारने जर सूचना मागितल्या असतील तर आपण त्या दिल्या पाहिजेत. कायदा करण्यापूर्वी सरकार आमचे मत विचारात घेत आहे, ही चांगली गोष्ट आहे. चबरोबर सुधीर मिश्रा म्हणतात की, सध्या कोरोनाच्या साथीमुळे अवघे मनोरंजन विश्व आधीच त्रस्त आहे आणि आता हा नवा नियमही समोर आला आहे.

    मात्र, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अनुराग कश्यप यांनीही इतर अनेक निर्मात्यांसह या विरोधात ऑनलाईन याचिका दाखल केल्या आहेत.