सिनेमॅटोग्राफर केव्ही आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन

दोन आठवड्यांपूर्वी केव्ही आनंद यांची पत्नी आणि मुलगी कोविड पॉझिटीव्ह झाली होती. या दरम्यान आनंद यांनाही श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. यासोबतच छातीतही वेदना सुरू झाल्या. कोविड-१९मुळे आरोग्य विषयक समस्यांची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    चेन्नई: हिंदी तसेच दक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत छायांकन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर केव्ही आनंद (५४) यांचे आज चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी केव्ही आनंद यांची पत्नी आणि मुलगी कोविड पॉझिटीव्ह झाली होती. या दरम्यान आनंद यांनाही श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. यासोबतच छातीतही वेदना सुरू झाल्या. कोविड-१९मुळे आरोग्य विषयक समस्यांची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    डीओपी आनंद यांनी ‘लिजेंड ऑफ भगत सिंग’, ‘जोश’, ‘नायक : द रियल हिरो’, ‘खाकी’ आदी गाजलेल्या हिंदी चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. तमिळ सिनेसृष्टीतून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या आनंद यांनी ‘अयान’, ‘मत्तराम’, ‘काप्पान’ या आणि अशा बऱ्याच तमिळ चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. १९९४ मध्ये ‘थेनमवीन कोम्बठ’ या मोहनलाल आणि शोभना अभिनीत चित्रपटाच्या नेत्रसुखद छायांकनासाठी आनंद यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आनंद यांच्या अचानक जाण्यामुळे दक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीनेही दु:ख व्यक्त केले आहे. रजनीकांत, मोहनलाल, पृथ्वीराज, अल्लू अर्जुन, तमन्ना भाटीया आदी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.