सलमान खानला विमानतळावर अडवणाऱ्या त्या जवानाला मिळाली शिक्षा? ट्वीट केला उलगडा!

सुरक्षा दलाच्या वागण्यानंतर त्याचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं. त्यानंतर जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.

  काही दिवसांपासून सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. तो म्हणजे ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि कतरिना दोघं रशियाला रवाना झाले. त्यावेळी विमानतळावरचा हा व्हिडिओ आहे. सलमानबरोबरच विमानतळावरील सुरक्षा दलाचा जवानही चर्चेत आला आहे.

  काय होतं व्हिडिओत

  व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान खान एका आलिशान गाडीतून उतरताना दिसतोय. एअरपोर्टवर एन्ट्री घेताच. सीआरएफ चा जवान त्याला अडवतो व ओळखपटवण्यासाठी बाजूला घेतो. त्यानंतर सलमान मास्क काढत सर्व प्रक्रिया पुर्ण करतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच सलमान आणि त्या जवानाच कौतुक होत आहे.

  सुरक्षा दलाच्या वागण्यानंतर त्याचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं. त्यानंतर जवानाचा मोबाईल जप्त करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. जवान सोमनाथ मोहंतीवर प्रोटोकॉल उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या जवानावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे.

  कारवाई नाहीच

  सीआईएसएफ कडून एक ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या बातमीत काहीही खरं नाही. त्या जवानाला त्याच्या योग्य वागणूकीबद्दल योग्य ते बक्षीस देण्यात आले आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.