राजा राणीवर नवं संकट, संजीवनी करणार रणजीतला अटक?

संजीवनी आणि रणजीत या संकटाला कसे सामोरे जातील हे बघा १६ आणि १७ जुलैच्या राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

    राजा रानीची गं जोडी मालिकेत संजीवनीच्या आयुष्यातील संकट काही कमी होण्याचं नावं घेत नाही. आता इतक्या महिन्यानंतर कुठे दोघांच्या वाट्याला सुखाचे, आनंदाचे क्षण येऊ लागले होते, पण तेदेखील त्यांच्या नशिबी नाही की काय असं वाटू लागले आहे. दादासाहेंबांनी संजीवनी – रणजीतविरुध्द रचलेल्या नव्या कटामुळे एक नवं संकट येऊन उभं राहीले आहे. यामुळे दोघाच्या संसारात कुठलं मोठ वादळ येणार आहे हे प्रेक्षकांना या आठवड्यात कळणार आहे. संजीवनी रणजीतला अटक करण्यासाठी घरी येणार आहे, तिच्यासाठी हे आयुष्यातील सगळ्यात मोठं आव्हानं असणार यात शंका नाही. पण ते म्हणतात ना, जेंव्हा नाती घट्ट होऊ पहातात तेव्हाचं त्यांची कसोटी लागते हे अगदी खरे आहे. 

    PSI संजीवनी की ढालेपाटील यांची सून, रणजीतची बायको संजीवनी यामध्ये संजीवनीची मोठी कसोटी लागणार आहे. पण आयुष्यातील या मोठ्या संकटालादेखील राजाच्या साथीने राणी कशी मात देईल ? संजीवनी आणि रणजीत या संकटाला कसे सामोरे जातील हे बघा १६ आणि १७ जुलैच्या राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
     
    दादासाहेब, राजश्री वाहिनी आणि अपर्णा यांनी रचलेल्या कटामध्ये रणजीत आता पुर्णपणे अडकला असून त्याच्या नावाचे अरेस्ट वॉरण्ट निघते आणि त्याला अटक करण्याची जबाबदारी संजीवनीवर सोपण्यात येते. आता हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे की, संजीवनी रणजीतला अटक करणार ? पुढ काय घडणार ? जाणून घेण्यासाठी बघा १६ आणि १७ जुलैच्या राजा रानीची गं जोडी मालिकेच्या विशेष भागामध्ये संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. आणि बघत रहा आपली लाडकी मालिका राजा रानीची गं जोडी सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.