सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने गाठला २५० भागांचा पल्ला, अभि आणि लतिकाने व्यक्त भावना म्हणाले…

आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे.

    रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने आज २५० भागांचा पल्ला गाठला. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली… आता मालिकेने २५० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.

    आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे. तेंव्हा नक्की बघा सुंदरा मनामध्ये भरली सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

     
    मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. अभिमन्युला दौलतने दिलेली नोकरीची ऑफर त्याने नाकारली असून दौलतच्या आईच्या म्हणण्यावरुन नोकरीची ऑफर अभी स्वीकारेल ? याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल ?  लतिकाला हे कळल्यावर काय होईल ? कोणते नवे वळण मालिकेला येणार आहे, हे जाणून घेण्यासाठी बघा सुंदरा मनामध्ये भरली सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.