Admit your mistake; Comedian Johnny Lever's reaction to the Bharti Singh drugs case

मला त्या दिग्दर्शकाने फोन केला नाही. पण त्यानंतर मला लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती.’

    कॉमेडियन भारती सिंह ही नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा भारती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. भारतीने नुकतीच मनीष पॉलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने करिअरच्या सुरुवातील इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.

    भारती म्हणाली, मला कपिल शर्माकडून कळाले की ऑडिशन सुरू आहेत. मी तिथे जाण्यास तयार झाले. कपिलने मला ऑडिशनविषयी सांगितले होते. मला कळले होते की ऑडिशन घेणारी व्यक्ती मुलींसोबतच चुकीच्या पद्धतीने वागते. मी माझ्या एका मैत्रीणीसोबत ऑडिशन देण्यासाठी गेले’ पुढे भारती म्हणाली, ‘ऑडिशनला जाण्यापूर्वी मी माझ्या मैत्रीणीला म्हणाले जर मी १५ मिनिटात बाहेर नाही आले तर पोलिसांना फोन करुन बोलाव. नंतर मी ऑडिशन देण्यासाठी गेले. एका खोलीमध्ये एक व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीने शॉर्ट आणि टीशर्ट परिधान केला होता. त्याने मला मी काय करते असे विचारले. मी ऑडिशन दिले. त्यानंतर घरी आले. मला त्या दिग्दर्शकाने फोन केला नाही. पण त्यानंतर मला लाफ्टर चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती.’

    भारती सिंह तिच्या दिलखुलास आणि विनोदी अंदाजाने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीने तिच्या विनोदी शैलीने अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती सध्या पती हर्षसोबत ‘डान्स दीवाने’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.