‘या’ तारखेला मुंबईत येतेय…वेळही कळवेनच, कंगनाचं खुलं आव्हान!

अभिनेत्री कंगंना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो आहे. कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला असून, आता मुंबईत परतत आहे, वेळही कळवेनच, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर थांबवून दाखवा, असं खुलं आव्हान कंगनाने विरोधकांना दिले आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून अभिनेत्री कंगंना रनौत (Actress Kangana Ranaut) नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. तसेच मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे आता कंगणावर सोशल मीडियावर चहुबाजुंनी टीकेची झड उठली आहे. अभिनेत्री कंगंना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो आहे. कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला असून, आता मुंबईत परतत आहे, वेळही कळवेनच, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर थांबवून दाखवा, असं खुलं आव्हान कंगनाने विरोधकांना दिले आहे.

यापूर्वी कंगनाने केलेल्या वक्तव्यांनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नको, असा इशारा दिला होता. त्यापूर्वी कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये मुंबईतील फिल्म माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे म्हटले होते. त्यापूर्वी कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये तीने संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. ‘शिवसेना नेते संजय राऊत मला जाहीरपणे धमकी देत आहेत, की मुंबईत परत येऊ नकोस. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये आजादी गँगनंतर जाहीर धमक्या, मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटत आहे?’ असे ट्विट कंगनाने केले होते.

दुसरीकडे संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सलेल्या सामना दैनिकातूनराऊत यांनी लिहिले होते की ‘ कंगनाने मुंबईत येऊ नये, अशी विनंती करतो. कंगनाची वक्तव्ये ही मुंबई पोलिसांचा अवमान करण्यासाआठीच करण्यात येत आहेत. गृहमंत्रालयाने यावर कारवाई करायला हवी’. यावरुन आता राजकारणही सुरु झाले असून भाजपा नेते आशिष शेलार यांनी कंगनाच्या पाठिशी उभे राहून संजय राऊत यांनी वातावरण बिघडवू नये, अशी टीका केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष विलित करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे.

आता याच मुद्द्याला पुढे नेत कंगनाने ट्विट केले आहे, त्यात ती म्हणते, मी बघतेय की अनेक जण मी मुंबईत येऊ नये यासाठी मला धमक्या देत आहेत. यासाठी येत्या ९ सप्टेंबंरला मी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर उतरल्यावर पुन्हा पोस्ट करेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर मला अडवून दाखवावे.