लैंगिक शोषणाची तक्रार: अनुराग कश्यप यांची आठ तास चौकशी

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार (Complaint of sexual harassment) केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांना पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना चौकशीसाठी गुरुवारी वर्सोवा (Varsova)  पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले.

मुंबई : अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार (Complaint of sexual harassment) केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांना पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना चौकशीसाठी गुरुवारी वर्सोवा (Varsova)  पोलीस ठाण्यात हजर राहावे लागले. लैंगिक अत्याचाराचा प्रकार २०१३-१४ दरम्यान घडल्याचा अभिनेत्रीचा (Actress) आरोप आहे. तिच्या तक्रारीनुसार, कश्यप यांच्यावर वर्सोवा पोलिसांनी (Police) २२ सप्टेंबर, २०२० रोजी दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

चित्रपट निमार्ते अनुराग कश्यप गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाले. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर रात्री साडेसातला ते बाहेर पडले. घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्री पायल घोषने त्यांच्यावर केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते.

कश्यप यांना अटक करण्याची मागणी पीडित अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील  नितीन सातपुते यांनी केली. त्यासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला. तसेच वाय सुरक्षा मिळावी यासाठी पीडितेने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. सध्या कश्यप यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कश्यप यांनी मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.