अभिनेता सलमान खानला मारण्याचा कट

बॉलिवूडच्या दबंगला मारण्याचा कट फरीदाबाद पोलिसांनी उधळून लावालाय. सलमान खानला मारण्याचा कट तुरुंगातच रचला जात होता. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. सलमानला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या शार्प शुटरला पोलिसांनी अटक केलीय.

बॉलिवूडच्या दबंगला मारण्याचा कट फरीदाबाद पोलिसांनी उधळून लावालाय. सलमान खानला मारण्याचा कट तुरुंगातच रचला जात होता. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी शार्प शुटर मुंबईत दाखलही झाला होता. मात्र, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केलीय. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे, आणि त्यामुळेच हा प्लान फसल्याचं या शार्प शुटरने सांगितलंय. या गँगचा शार्प शूटर राहुल उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केलीय.

पोलिसांच्या माहितीनुसार सलमान खानला मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. या शार्प शूटरने जानेवारीत मुंबईत येऊन सलमानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती. याआधीही काळवीटप्रकरणी बिश्नोईने सलमानला मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानवर काळवीटाला मारल्याचा आरोप आहे.. राजस्थानमध्ये बिश्नोई समाजात काळवीटाची पूजा केली जाते. त्यामुळे बिश्नोई समाजाने सलमानविरोधात खटलाही दाखल केला आहे. तेव्हापासूनच बिश्नोईने सलमानला मारण्याचा कट रचला होता.