‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या या स्पर्धकाला प्रेक्षकाने दिली नोकरी, या स्पर्धकाने महाअंतिम सोहळ्यात पटकावलं दुसरं स्थान!

दीपकने 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या शोमध्ये अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावले होते. या अंतिम सोहळ्याला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अशोक खाडे यांनी दीपकला त्यांच्या कंपनीमध्ये चीफ सिक्युरिटी ऑफिसरची पोस्ट दिली आहे.

  महाराष्ट्राज बेस्ट डान्सरचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात प्रथमेश मानेने विजेतेपद पटकावले. पण सर्वाधिक चर्चा रंगली ती दीपक हुलसुरे या स्पर्धकाची. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या दीपकचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ शोच्या अंतिम सोहळ्याला उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने दीपकचा इथपर्यंतचा प्रवास पाहून चक्क दीपकला नोकरी दिली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepak Hulsure (@deepakhulsure6)

  दीपक हा लातूरमधील जगलपूर भागातील एका गरीब कुटुंबातून आहे. लहानपणापासूनच त्याला नृत्याची आवड होती. पण घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला नृत्याचे शिक्षण घेता आले नाही. पण महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. वडिलांनी घेऊन दिलेल्या मोबाईलवर व्हिडीओ पाहून तो डान्स शिकू लागला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepak Hulsure (@deepakhulsure6)

  दीपकने ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावले होते. या अंतिम सोहळ्याला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या अशोक खाडे यांनी दीपकला त्यांच्या कंपनीमध्ये चीफ सिक्युरिटी ऑफिसरची पोस्ट दिली आहे.

  अशोक खाडे म्हणाले,  मला असं वाटलं त्याची गरीबी दूर करावी. त्यासाठी मी विचार केला की दीपकला माझ्या कंपनीमध्ये नोकरी देणार. नोकरी दिल्यानंतर त्याच्या पगारातले १५ हजार त्याच्या आई-वडिलांना गावी पाठवून देणार. त्यातले १० हजार रुपये मी त्याला मुंबईमध्ये राहाण्यासाठी खर्च करायला देणार. माझ्या कंपनीमध्ये तो चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करेन. त्याच्यासाठी माझी एकच अट असेल की त्याने महिन्यातले चार दिवस माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्यासोबत चहा प्यावा.