balshiv

‘बालशिव- महादेव की अनदेखी गाथा’(Balshiv - Mahadev Ki Andekhi Gatha) या मालिकेविरोधात स्वामित्व हक्क कायद्याचे (कॉपीराईट) उल्लंघन (Copyright)केल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल(High Court) करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने मालिकेच पहिले १० भाग (एपिसोड) याचिकाकर्त्यांना दाखविण्याचे निर्देश ‘झी’ एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसला(Zee Entertainment Enterprizes) न्यायालयाने दिले.

    मुंबई:‘झी’ (Zee)वाहिनीवर पुढील आठवड्यापासून प्रसारित होणाऱ्या ‘बालशिव- महादेव की अनदेखी गाथा’(Balshiv – Mahadev Ki Andekhi Gatha) या मालिकेविरोधात स्वामित्व हक्क कायद्याचे (कॉपीराईट) उल्लंघन (Copyright)केल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल(High Court) करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने मालिकेच पहिले १० भाग (एपिसोड) याचिकाकर्त्यांना दाखविण्याचे निर्देश ‘झी’ एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसला(Zee Entertainment Enterprizes) न्यायालयाने दिले.

    येत्या ३१ऑगस्टपासून ‘झी’ टिव्हीवाहिनीवर ‘बालशिव – महादेव की अनदेखी गाथा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. मात्र, पौराणिक कथाकार आणि तज्ज्ञ छोटेनैन सैनी यांनी मालिकेच्या प्रसाऱणाला विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आपण बालशिव या कथेची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्या कथेचा आधार घेत ‘झी’ टिव्हीवर मालिका सुरू केल्याचा आरोप करत मालिका प्रसारित करण्यावर बंदी आणावी, अशी मागणी सैनी यांनी याचिकेतून केली आहे. त्यावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, २०१८ मध्ये ‘झी’ च्या काही प्रतिनिधीसमोर बालशिव या कथेची संकल्पना सविस्तर मांडली होती. ती कल्पना कोणत्याही कथा, कादंबऱ्या अथवा पुराणांनुसार नसून ती याचिकाकर्त्यांची स्वतःची कल्पना असल्याचा दावा त्यांच्यावतीने वकील व्हि. धोंड यांनी केला. ‘झी’ ने त्यांची संकल्पना चोरून मालिका बनविण्याचा घाट घातला असून हे स्वामित्व हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी सांगितले.

    त्यावर फक्त ४० ते ५०सेकांदाच्या प्रोमोवरून सैनी यांनी त्यांच्या संकल्पनेचा वापर केल्याचा समज करू नये, तसेच बालशिव ही संकल्पना याआधीही अनेक पौराणिक मालिका आणि चित्रपटात दाखविण्यात आली असल्याची माहिती ‘झी’ च्या वतीने वकील विराग तुळजापूरकर यांनी दिली. तसेच तीन महिने प्रसारित करण्यात येतील इतके मालिकेचे भाग तयार असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर जर संकल्पनेचा विषय असेल तर मालिकेचे काही भाग सैनींना दाखविण्यात यावेत, त्यातूनच चित्र अधिक स्पष्ट होऊन त्यांना पुरावेही मिळतील, असे सैनींच्यावतीने वकील धोंड यांनी सांगितले. दोन्ही पक्षकारंची बाजू ऐकून घेत सैनी यांना मालिकेचे काही भाग दाखविण्यास आले तर स्वामित्व हक्क कायद्याचे उल्लंघन झाले की नाही ते स्पष्ट होईल, असे नमूद करत खंडपीठाने ‘झी’ ला मालिकेचे १० भाग सैनींना दाखविण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत मालिकेच्या प्रसिद्धीस बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. त्यावर ३१ ऑगस्ट रोजी होणारे मालिकेचे प्रक्षेपण १५ सप्टेंबरपर्यंत थाबविण्याची हमी ‘झी’ च्यावतीने देण्यात आली. मात्र, मालिकेचे प्रोमो आणि प्रक्षेपणाची नवीन तारीख जाहीर करण्याचे स्वातंत्र्य ‘झी’ ला देताना त्यांचे स्वतःचे सर्व अधिकार अबाधित ठेवत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.