संगीत क्षेत्राला कोरोनाचा विळखा : सुप्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम(S P Balasubrahmanyam)यांना कोरोनाची (coronavirus) बाधा झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती ते उपचार घेत असलेल्या MGM रुग्णालयाने (MGM hospital) पत्रकाद्वारे दिली आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

एस. पी. यांना ५ ऑगस्ट रोजी कोरोनाची झाल्याने त्यांना चेन्नईतील (Chennai )MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. पण, अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूत हालवण्यात आले. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.