सध्या धारावीत कोरोनाचा एकही रूग्ण पॉझिटिव्ह नाहीये. मुंबईतल्या धारावीत कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. त्यामुळे मुंबईकरांच धाबं दणाणलं होतं. धारावीतील कोरोनाचं संसर्ग थांबवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO नेही घेतली आहे. गेल्या २४ तासात धारावीत कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाहीये.

Christmas has brought cheer! #Dharavi reported ‘Zero’ #Covid19 positive cases. #COVID19
.@mybmcWardGN @DighavkarKiran— Ajay Devgn (@ajaydevgn) December 26, 2020
ही बातमी ऐकल्यावर अजय देवगणने समाधान व्यक्त केलय. “नाताळ आपल्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आलाय. पाहा आता धारावीमध्ये एकही करोनाचा रुग्ण नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपला आनंद व्यक्त केला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
धारावीसारख्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्य़ात आली होती. काही जणांकडून सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा ‘वुहान’ असाही उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्यानंतर प्रशासनानं त्वरित या ठिकाणी आयसोलेशनची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था केली. तसंच सामूहिक शौचालयाची समस्याही दूर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामुळे धारावीसारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं.