Sakhi-Gokhale-Suvrat-Joshi-

‘१२ एप्रिल, आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी मला आणि सखीला अनोखे गिफ्ट मिळाले. आमच्या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

  मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके कपल म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच अनोखी भेट मिळाल्याचे सांगितले आहे. सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने दुसऱ्या वाढदिवशीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sula (@suvratjoshi)

  ‘१२ एप्रिल, आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी मला आणि सखीला अनोखे गिफ्ट मिळाले. आमच्या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सुरुवातीला आम्ही कोणालाच सांगितले नाही कारण सर्वांना काळजी वाटेल. आम्ही योग्य ती काळजी घेतली. आता मी हळूहळू थोडा व्यायाम सुरु केला आहे. दोन आठवड्यानंतर आम्ही प्लाजमा डोनेट करण्यासाठी जाणार आहोत’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sula (@suvratjoshi)

   

  पुढे तो म्हणाला, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर मी परेदाशात एका चित्रपटाचे, दोन वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले. आम्ही अमर फोटो स्टुडीओ नाटकाचे प्रयोग देखील पुन्हा सुरु केले होते. त्यावेळी मी अनेकांच्या संपर्कात आलो होतो त्यामुळे मला करोना होऊन गेला असे वाटत होते. पण असं नाही. कोरोनाची लक्षणे फार वेगळी आहेत.’