kangana

कंगनाने(kangana) तिच्याविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही वकील रिझवान सिद्दिकीमार्फत आव्हान दिले असून कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. त्यावर बुधवारी न्या. रेवती-मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी(Hearing Of kangan`s Case) पार पडली.

    मुंबई:बॉलीवूड अभिनेत्री कंगना(kangana Ranaut) रणौतविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य असल्याचा दावा बुधवारी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)करण्यात आला. दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

    कंगनाने तिच्याविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही वकील रिझवान सिद्दिकीमार्फत आव्हान दिले असून कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. त्यावर बुधवारी न्या. रेवती-मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, अख्तर यांच्याकडून न्यायालयात पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. कंगनाविरोधात दंडाधझिकारी न्यायालयाने केलेली कारवाईकायदेशीर मार्गाने करण्यात आली असून मानहानीच्या फौजदारी दाव्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तरतूदीचे पालन करण्यता आले असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याला कंगनाकडून विरोध करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीवर कारवाई करण्यात आली असून

    न्यायालयाकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात आलेली नसल्याचा दावा कंगानाच्यावतीने वकील एजाज सिध्दिकी करत आपला युक्तिवाद थांबवला. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

    फौजदारी खटल्यावर १४ सप्टेंबरला सुनावणी
    अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. सोशल मीडियावर ही मुलाखत मोठ्या प्रमाणात वायरल झाली होती. मात्र, हे आरोप तथ्य आणि अर्थहीन आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयाने जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, अख्तर यांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते. त्यावर आता अंधेरी न्यायालयात १४ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पार पडणार आहे.