बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात, एकापाठोपाठ एक दिग्गज होतायत कोरोना बाधित!

दुसरीकडे बॉलिवूडवर कोरोनाचे ढग पसरताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी वाढताना दिसत आहे.

  राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडवर कोरोनाचे ढग पसरताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी वाढताना दिसत आहे.

  अक्षय कुमार

  ४ एप्रिलला अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली. सोशल मीडियावरून अक्षयने त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची बातमी दिली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाइन होता. मात्र अक्षय कुमारची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हीरानंदानी रुग्णालयात अक्षय कुमारला दाखल करण्यात आलं आहे. तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, तुमच्या प्रार्थनांचा प्रभाव दिसत आहे. आशा करतो लवकर घरी परतेन, काळजी घ्या.” अशा आशयाचं ट्विट अक्षयने केलं आहे.

  भूमि पेडणेकर

  भूमी पेडणेकरने सोशल मीडियावरून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. भूमीने एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. मी विलगीकरणात असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या. ” असं म्हणत भूमीने ती संपूर्ण काळजी घेत असल्याचं सांगितलं आहे.

  विकी कौशल

  अभिनेता विकी कौशलला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. “संपूर्ण काळजी घेऊनही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या,” अशी पोस्ट विकीने केली आहे.

  गोविंदा

  आहे. सध्या गोविंदा होम क्वारंटाइन आहे. गोविंदा करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही घरातील सगळ्यांची करोना चाचणी केली. तर, घरातील सगळ्यांची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे, सोबतच घरातील स्टाफची चाचणीही निगेटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती.

  आमिर खान

  “आमिर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असं आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

  आर माधवन

  आर माधवनने ट्विटर अकाऊंटवर ३ इडियट्स या चित्रपटातील एक पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने मजेशीर अंदाजात कोरोना झाल्याचे सांगितले आहे. ‘फरहानने नेहमीच रँचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लकरच बरे होऊ. ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते’ या आशयाचे ट्वीट आर माधवनने केले आहे.

  आलिया भट्ट

  अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण झाली आहे. आलिया भट्टला कोरोनाची लागण झाल्यानंतर आलियाची आई सोनी राजदान यांची चिंता वाढल्याचं दिसतंय. आलिया भट्टला कोरोनाची लागण झाल्यानंतर सोनी राजदान यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. करोनाची दुसरी लाट धोदायक असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.