मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर CSK चा प्लेअर फिदा, फोटोवर कमेंट करत म्हणाला….

 सायलीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.

    काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीवने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सायलीचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. सायली सतत सोशल मीडियावर अपडेट आपल्या चाहत्यांना देत असते. मालिकांपासून सुरु झालेला सायलीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

    सध्या सायलीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. या चर्चा तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत.

    सायलीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.

    त्यावर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने दिलेल्या कमेंटमुळे ती चर्चेत आली आहे. ऋतुराजने “Woahh” अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच ऋतुराज गायकवाडच्या कमेंटने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.