ram gopal varma

दरवेळी त्यांच्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होतो. त्यामुळे आता राम गोपाल वर्मा आणि वाद हे समीकरणच झालं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. राम गोपाल वर्मा सध्या डी कंपनी या चित्रपटाच्या शुटींमध्ये व्यस्त आहेत.

राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वक्त्व्यांमुळे जास्त चर्चेत असतात. दरवेळी त्यांच्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होतो. त्यामुळे आता राम गोपाल वर्मा आणि वाद हे समीकरणच झालं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राम गोपाल वर्मा मुलाखतीत म्हणाले आहेत की, गैंगस्टर सारख्या चित्रपटांसाठी मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. राम गोपाल वर्मा सध्या डी कंपनी या चित्रपटाच्या शुटींमध्ये व्यस्त आहेत.

महिलांवर केलेल्या वक्तव्यामुळे आले होते चर्चेत

मला महिलांचं शरीर आवडतं,  मेंदू नाही, असं वक्तव्यांनी त्यांनी केल्याचं एका वृत्तपत्रात याचा उल्लेख करण्यात आलय. “मेंदू स्त्रियांनाही असतो आणि पुरुषांनाही. मात्र लैंगिक पैलू अत्यंत वेगळा आणि विशिष्ट आहे. स्त्रीजवळ एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे तिची कामुकता आणि त्या गोष्टीची मी प्रशंसा करतो. माझ्या ‘Guns & Thighs’ या पुस्तकातदेखील मी त्याविषयी लिहिलं आहे. मला स्त्रियांचं शरीर आवडतं, पण मेंदू नाही”, असं वक्तव्य राम गोपाल वर्मा यांनी केलं.

३२ संघटना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करणार नाहीत

निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या विरोधात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयजने एका बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या फेडरेशनच्या ३२ संघटनांपैकी कोणतीही संघटना यापुढे राम गोपार वर्माबरोबक देशामध्ये कुठल्याही भागात काम करणार नाही. कारण राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाशी संबंधित कलाकार, टेक्नीशियन आणि कामगारांची सुमारे १.२५  कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही.