डेझी शाह म्हणते, टीक- टॉक बंद केल्यामुळे बेरोजगार झालेल्यांबद्दल वाटते दु:ख

भारतात ५९ चिनी अॅप्लीकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात टीक - टॉकचाही समावेश आहे. सगळेजण या निर्णयाचे स्वागत करत असले तरी डेझी शाहने मात्र या निर्णयाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. टीक - टॉकवर

भारतात ५९ चिनी अॅप्लीकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात टीक – टॉकचाही समावेश आहे. सगळेजण या निर्णयाचे स्वागत करत असले तरी डेझी शाहने मात्र या निर्णयाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. टीक – टॉकवर बंदी घालण्यात आल्यामुळे बेरोजगार लोकांसाठी तिने दु:ख व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीत डेझी शाहने आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणते की, टीक-टॉक हे भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्सपैकी एक आहे. देशातील अनेक लोक टीक- टॉकवर व्हिडीओ टाकून पैसे मिळवत होते. काही लोकांसाठी हे रोजगाराचे साधन होते. अनेकांसाठी आपली कला पोहोचविण्याचे साधन होते. चीनला धडा शिकविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला त्याचा आनंद आहे पण बेरोजगार झालेल्या कलाकारांबद्दल दु:ख वाटते, असे डेझी म्हणते.