आधी १८ क्रू मेंबर्स आणि आता डान्स दिवानेच्या परिक्षकाला झाली कोरोनाची लागण, त्या जागी दिसणार नवीन परिक्षक!

डान्स दीवानेच्या पुढच्या भागात धर्मेशच्या जागी कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ती मोहन घेणार आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया हे देखील तेव्हा असतील.

  राज्यात कोरोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आह. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘डान्स दीवाने’ सेटवर १८ क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली होती. आता परिक्षक धर्मेश येलांडेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  ‘डान्स दीवाने’चे निर्माते अरविंद राव यांनी याची माहिती दिली आहे. “गेल्या आठवड्यात धर्मेश जेव्हा घराच्या नूतनीकरणासाठी गोव्याला गेला तेव्हा त्याची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली होती. ५ एप्रिलला तो शूटसाठी इथे येणार होता. पण, शूटिंग सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाला कोरोना चाचणी घ्यायची होती.

  धर्मेशने गोव्यात आणखी एक चाचणी केली त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली,  म्हणून आम्ही पुढच्या भागासाठी शक्ती मोहन आणि पुनीत जे पाठक यांना आणण्याचे ठरविले. त्यांनी माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांच्यासह या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. ”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  धर्मेश त्याच्या गोव्यातील घरी होम क्वारंटाईनमध्ये आहे. डान्स दीवानेच्या पुढच्या भागात धर्मेशच्या जागी कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ती मोहन घेणार आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया हे देखील तेव्हा असतील.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)