astad deboo

दिग्गज नर्तक अस्ताद देबू (Astad Deboo) यांचं आज मुंबईत निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अस्ताद देबू आजारी होते.

दिग्गज नर्तक अस्ताद देबू यांचं आज मुंबईत(astad deboo death) निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अस्ताद देबू आजारी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Astad deboo (@astaddeboo)

कथ्थक आणि कथकली यांना एकत्र करून डान्सचा नवीन फॉर्म बनवणारे अशी अस्ताद देबू यांची खास ओळख आहे. गुजरातच्या नवसारीमध्ये १३ जुलै १९४७ अस्ताद देबू यांचा जन्म झाला. त्यांनी प्रल्हाद दास यांच्याकडून कथ्थकचं शिक्षण घेतलं . तसेच त्यांनी गुरू ई के पनिक्कर यांच्याकडून कथकलीचं शिक्षण घेतलं. अस्ताद देबू यांनी नृत्य जगतात तब्बल ५ दशके काम केले आहे.  जगातील ७० देशांमध्ये त्यांनी आपल्या नृत्यकलेचं सादरीकरण केलं आहे.

केवळ डान्सच नव्हे तर समाजसेवेतही त्यांनी चांगली कामगिरी केली. ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी त्यांनी विशेष काम केले. २००२ साली अस्ताद देबू डान्स फाऊंडेशनद्वारे दिव्यांगांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

अस्ताद देबू यांनी मणिरत्नम, विशाल भारद्वाज अशा दिग्गज  दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. अस्ताद देबू यांना १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय २००७ साली त्यांना पद्मश्रीनं गौरवण्यात आलं.