
डेव्हिड धवन यांनी आपल्या जुन्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा रिमेक केला आहे. या नव्या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
नव्वदीच्या दशकातला काळ गाजवलेला ‘कुली नंबर १’(coolie no. 1) हा गोविंदाचा चित्रपट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. डेव्हिड धवन(david dhavan) यांनी या चित्रपटाचा रिमेक केला आहे. ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचे काम पूर्ण झाले आहे. नुकतंच त्याचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.सोबतच ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात पहिल्यांदा वरुण धवन आणि सारा अली खान ही जोडी एकत्र दिसणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरसोबत या चित्रपटाचा ट्रेलर २८ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सारा पारंपरिक साडीमध्ये दिसून येत आहे. वरुण पाच वेगवेगळ्या रुपांमध्ये झळकला आहे. हे पोस्टर साराने शेअर केले आहे.